भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें

pashanachi karuni murti | sthapana kariti dvijamukhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥ तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥ मारिती पशूंच्या दावणी । सुरापाणी आल्हाद जयां ॥३॥ आमुचा देव म्हणती भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥ ऐशा देवा देव म्हणे न कोणीही । एका विनवी जनार्दनीं ॥५॥