भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व

paripurnapanen ubha | disen kardalanchi gabha | angichiya prabha | dhavalalen vishva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । आम्हां जोडला वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥ तें सुख सांगतां कोडीं । पापें पळती बापुडीं । यमधर्म हात जोडी । न येचि तया गांवा ॥३॥ ऐसें एकविधभावाचे । संतचरण वंदिती साचे । एका जनार्दनीं त्यांचें । दर्शन दुर्लभ ॥४॥