भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला

panthastha gharasi ala | pratahkalin uthoni gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥ तैसें असावें संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥ बाळीं घराचार मांडिला । तो सवेंचि मोडूनि गेला ॥३॥ एका विनवी जनार्दना । ऐसें करी गा माझ्या मना ॥४॥