भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला

paniyacha masa jala | namarupa nahin ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला ॥१॥ तें पूर्वीच पाणी आहे । तेथें पारधी साधील काय ॥२॥ जंव पारधी घाली जाळें । तंव त्याचेंच तोंड काळें ॥३॥ एका जनार्दनीं सर्वही पाणी । माशियाची कैंची खाणी ॥४॥