भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें

pandharis javaya | sada het manasin jaya | kalikal vandi paya | taya haribhaktanten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥ दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥ एका जनार्दनीं भाव । नपेक्षी तया देव । करुनि संसार वाव । निजपदी ठाव देतुसे ॥३॥