भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे देव

pandharichi mat sange naradamuni | santanche kirtanin nache dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे देव ॥१॥ नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेथें काय पाड ॥२॥ तिहीं लोकां पाहतां ऐसें नाहीं कोठें । कैवल्याची पेठ पंढरी देखा ॥३॥ ऐकोनी अमरनाथ संतोषला मनीं । एका जनार्दनीं नारद सांगे ॥४॥