भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी

pandhari navhe ekadeshi | viththal sarvatra nivasi

रचनाकार: संत रामदास · अभंग
पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ।। आम्हीं देखिला विठोबा । आनंदे विटेवरीं उभा ।। तेथे दृश्यांची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टी ।। रामदासीं दर्शन जालें ।आत्मविठ्ठला देखिलें ।।