भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला

panch varushi nama jahala | chhand vithucha lagala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला ॥१॥ जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥ विठ्ठल हरि वाचे छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ॥३॥ एका जनार्दनीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर ॥४॥