भजनी मालिका
← भजनांकडे परत

पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे

palate bhavana santache sangati | abhavikanhi bhakti pragatatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥ तारितीं आणिकां देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनीं पवित्र नाम गाती ॥३॥