भजनी मालिका
← भजनांकडे परत

पळ पळ आयुष्य खातसे काळ । कां रे होसी सबळक पोसणा तूं

pal pal ayushya khatase kal | kan re hosi sabalak posana tun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पळ पळ आयुष्य खातसे काळ । कां रे होसी सबळक पोसणा तूं ॥१॥ वाढविसी देह काळाचें भातुकें । कां रे तुज कौतुकें सुख वाटे ॥२॥ नामस्मरण करितां लाजसी पामरा । भोगिसी अघोरा यमदंडा ॥३॥ एका जनार्दनी सांगतसे हित । कां रे न घ्या त्वरित हरिनाम ॥४॥