भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहो नये दोष योगियांचे गुण

paho naye dosh yogiyanche gun

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
पाहो नये दोष योगियांचे गुण । ब्राह्म आचरण असो कांहीं ॥१॥ योगि तोचि ब्रह्मदेवाचाहि देव । नोहेचि मानव मासे जरि ॥२॥ योगीयांचें कांही नकळे देवांही । प्राकृत नर कांई कवण तेथें ॥३॥ करी भोगी सर्व परी योगी मुक्त । न करी तरी सत्य करी सर्व ॥४॥ योगीयाचे भोग चरित विषय कर्म । अवघे परब्रह्मा तारकची ॥५॥ नकरी योगी स्नान संध्या अनुष्ठान । स्पर्शे करी पावन ब्रह्मासिही ॥६॥ नलगे अविश्वास शंकेसी कारण । योगी तोचि पुर्ण परमात्मा ॥७॥ ताराया जढमुढां श्रीहरीं रुपें योगी । अवतरे युगायुगीं आन नाहीं ॥८॥ भुलुनि घनगुणविद्यारुपमदें । प्रवर्तति निन्दें भावोनि नर ॥९॥ यालागी करावा आधी बोध जगा । प्रशंसावे योगा झटुनि नित्य ॥१०॥ उद्धारावे विश्वातरीच देव प्राप्त । लाभे परहित पुण्यें देहीं ॥११॥ म्हणे जनार्दन ब्रह्म पाठींपोटीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥