भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन

pahatan pahatan kaisen palatalen man | dekhanechi davilenk choruni gagan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥ आनंदें जनार्दना लागलों मी पायां । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥ देखणेंचि केवळ दिसताहे सकळक । सुखाचे निष्फळ वोतिलें जग ॥३॥ एक जनार्दनीं निमाला एकपणें । मोहाचें सांडणें माया घेऊनी ॥४॥