भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे

pahatan disena tenchi baren pahe

रचनाकार: संत रामदास · अभंग
पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे । तेथें रुप आहे राघवाचें निराकार राम देखतां विश्राम । दुरी ठाके श्रम संसारींचा सर्वकाळ रामदर्शन होतसे । निर्गुणीं विश्वासें मन माझें संतसंगें घडे नि:संगाचा संग। राघवाचा योग रामदासीं।