भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव

paha kaisi navalachi thev | svayamev dehi dekhila dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥ नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥ नाहीं दान धर्म व्रत तप । अवघा देहीं जालो निष्पाप ॥३॥ पापपुण्याची नाहीं आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥