भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो

paha kaisa devacha navalavo | pahe tikade avagha devo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥ पाहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देहीं दाटला देव माझ्या ॥३॥ एका जनार्दनीं कैसें नवल जाहलें । दिशाद्रुम दाटले देहें सहजीं ॥४॥