भजनी मालिका
← भजनांकडे परत

नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं

nuravuni dusaren atan thelon charanin | nityanand bhogitunchi dinarajanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥ आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें । सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥ धरुनियां रुप दृष्टीं हदयभुवनीं । सांठवीन आपुलिया मनाचे मननीं ॥३॥ निळा म्हणे जन्मोनियां केली हे जोडी । विठोबाचि सेवा नित्य नविये आवडी ॥४॥