भजनी मालिका
← भजनांकडे परत

नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध

nohe brahmadnyani lekunrancha khel | avaghachi kolhal ashabaddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥ वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥ लावुनी विभुती बांधुनियां मठा । ब्रह्मज्ञान चेष्ठा दाविताती ॥३॥ माळा आणि मुद्रा लेवुंनियां सांग । ब्रह्माज्ञान सोंग दाविताती ॥४॥ एका जनार्दनीं संतसेवेविण । ब्रह्माज्ञानखुण न कलेचि ॥५॥