भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं । सोपानदेवा नामसंकीर्तनी । मुक्ताबाई निजमुक्तिस्थानीं । निजानंदीं गौरविलें

nivruttinathasin thevilen unmanin | sopanadeva namasankirtani | muktabai nijamuktisthanin | nijanandin gauravilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं । सोपानदेवा नामसंकीर्तनी । मुक्ताबाई निजमुक्तिस्थानीं । निजानंदीं गौरविलें ॥१॥ ज्ञानदेवा दिधली समाधी । नामदेवा स्थापिलें निजपदीं ॥ परसा भागवताची वाडनदी । सुस्नात केली कीर्तनें ॥२॥ वच्छरा आणि विसोबा खेंचर । कानुपात्रा मिराबाई परम सुंदर । अंतोबा नरहरी सोनार । चरणीं थारा दिधला त्या ॥३॥ गोरा सांवता कूर्मदास । सगुण स्वरुप भेटलें त्यास । नरसी मेहता पिपा भानुदास । केला वास त्यांच्या ह्रदयीं ॥४॥ एका जनार्दन स्वरुपस्थिती । जनजसवंताची परम प्रीति । कबिराचीं पुष्पें करुनी अंतीं । निजधामाप्रती पाठविलें ॥५॥ तुकयासी विमानीं वाहिलें । संतोबासी वैराग्यें न्हाणिले । निजस्थान पालखीं निजवलें । निजभुवनीं आपुलिये ॥६॥ निळा म्हणे आपुलीं बाळें । कडिये घेउनी पुरवी लळे । स्नेहाळु माउली कळवळे । प्रेम देउनी वाढवी ॥७॥