भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो

nitya to sohala karitati suravar vichar pahavayala dev yeto

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥ अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवुम धणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥ एका जनार्दनीं जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिलें ॥४॥