भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव

nitya shiv shiv athav | tutel janmamaran bhev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥ दुजें नाहीं पैं साधन । वाचे वादावा इशान ॥२॥ ऋद्धिसिद्धि पाया लागे । हृदयीं सदाशिव जागे ॥३॥ शंकर हा जया चित्तीं । जवळी तया भुक्ति मुक्ति ॥४॥ एका जनार्दनीं सर्वदा । महादेव वाचे वदा ॥५॥