भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगन्निवास लक्ष्मीसहित

nitya kal jethen namacha ghosh | tethen jagannivas lakshmisahit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगन्निवास लक्ष्मीसहित ॥१॥ ब्रह्माज्ञान तेथें लोळती अंगणीं । सेवुनी पायवणी घरी राहे ॥२॥ विष्णुदास तयाकडे न पाहाती फुका । नाम मुखीं देखा रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तया घरीं पुरुषोत्तम सदा वसे ॥४॥