भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा

nitya harikatha vaishnav sangat | tochi paramartha shuddha tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥ नाहीं कधीं द्वैत सदा तें अद्वैत । अभेदरहित सर्वकाळक ॥२॥ परमार्थसाधनीं झिजवितसें अंग । वाउगा उद्योग न करी कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा हेत । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥४॥