भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन

nitya ghade chandrabhage snan | shriviththaladarushan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥ त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥ उजवें घेतां राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥ संतांसवें कीर्तन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४॥ मोक्ष जोडोनियां हात । तयाची वाट तो पहात ॥५॥ धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनीं अभंग ॥६॥