भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा

nirgunapanacha abhiman sandila | nigam lajavila narayana

रचनाकार: संत गोणाई · अभंग
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ।। १॥ कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरिराया ।।२।। ठकुली पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी या बुद्धी आलासी पंडरियें ||३|| तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ||४|| अठ्ठावीस युगे गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवा ॥ ५॥ मग कटावरी कर धरोनियां धीर उभा निरंतर राहिलासी ।।६।। सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोर्णे कोणा ॥ ७॥ द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित सांग बुद्धीमंत कोण ऐसा।।८।। नाथिलेनि करिसी आपणा गोविसी । बोल कां ठेविसी नामयातें ।।९।। गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान। देई कृपादान बाळ माझें ।। १० ।।