भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण निरामय संचले । गुणीतीत रुपा आलें । परात्पर तें सगुण झालें । उभें ठाकलें विटेवरी

nirgun niramay sanchale | gunitit rupa alen | paratpar ten sagun jhalen | ubhen thakalen vitevari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निर्गुण निरामय संचले । गुणीतीत रुपा आलें । परात्पर तें सगुण झालें । उभें ठाकलें विटेवरी ॥१॥ कोटी कंदर्पाच्या दीप्ति । विराजली अंगकांति । गुणलावण्याची संपत्ती । विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥ पहातांचि प्रवेशे अंतरीं । मेनीं मनातें मोहरी । चित्तीं चैतन्यातें भरी । देहभावा उरी उरों नेदी ॥३॥ जीवाचें हरुनियां जीवपण । नेदी उरो मीतूंपण । वंदितांचि याचे चरण । करी बोळवण अहंकारा ॥४॥ निळा म्हणे भक्तपती । आला पुंडलिकाचिये आर्ती । अवघीं जाणतीं नेणतीं । केली सरतीं पायांपें ॥५॥