भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण

nirgun nirakar avayavarahit | jo shabdarupatit shiv jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥ चहूं वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥ ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥ एका जनार्दनीं नामरुपा वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव जाणा ॥४॥