भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले अतिशय ऐका

nirdhan purushachi dekha | stri bole atishay aika

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले अतिशय ऐका ॥१॥ दिवसा पोराची ताडातोडी । रात्रीं तुमची वोढावोढी ॥२॥ नाहीं घरीं खावया अन्न । संततीनें भरलें सदन ॥३॥ एका जनार्दनीं देवा । ऐसा स्त्रीचा हेलावा ॥४॥