भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्दय मानसी मारिताती दूत । कां रे चुकलेति रामनाम

nirday manasi maritati dut | kan re chukaleti ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्दय मानसी मारिताती दूत । कां रे चुकलेति रामनाम ॥१॥ प्रपंचाचे कामीं करूनि हव्यास। विसरला मुखास नाम घेतां ॥२॥ म्हणोनि वोढिती तोडिती निष्ठुर । दय ते अंतरा न ये त्यांच्या ॥३॥ एका जनार्दनीं निर्दय साचार । नाही आन विचार तये ठायीं ॥४॥