भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराश्रित वाटे मनीं । पडिलों जनीं एकला

nirashrit vate manin | padilon janin ekala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निराश्रित वाटे मनीं । पडिलों जनीं एकला ॥१॥ कृपेंविणे तुमच्या देवा । हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥ आजींचा दिवस उदयां नये । आयुष्य जाय क्षणाक्षणां ॥३॥ निळा म्हणे करुं काय । न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥