भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंतर नाम वदनीं । निजरुप ध्यानीं आठवितों

nirantar nam vadanin | nijarup dhyanin athaviton

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निरंतर नाम वदनीं । निजरुप ध्यानीं आठवितों ॥१॥ आणीक देवा कांही नेणें । मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥२॥ योगसाधन न कळें मंत्र । निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥ निळा म्हणे अज्ञान हरि । आहे परी सर्व मी ॥४॥