भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागें सारी

nirala nirala rahe tu sadhal | drushyache palhal magen sari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागें सारी ॥१॥ तेथे तीर्थ संन्यास घेई निश्चयाचा । मेरु होई सुखाचा सहजपणें ॥२॥ धृतीची धारणा नाद आणि मना । मेळवी गगना गुरुमुखें ॥३॥ तेथें पिंडापदा ग्रास स्वरुप चिदाकाश । एका जनार्दनीं वास एकपणें ॥४॥