भजनी मालिका
← भजनांकडे परत

निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची

nikat seve dhanuni ala | prushthi rahila ubhachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥ ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥ नाहीं मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं गोजिरें ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥