भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून

nij drushtivari jan | kam nivari darun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून ॥१॥ याचा नको घेऊं वारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥ कामक्रोधाचें हें बंड । याचें छेदी विवेकें तोंड ॥३॥ शांति क्षमा धरूनि आधीं । ब्रह्माज्ञान मग साधीं ॥४॥ हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एका जनार्दन ॥५॥