भजनी मालिका
← भजनांकडे परत

निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणें संतोषलें चित्त त्याचे

nighatan uttam shakun te jahale | tenen santoshalen chitta tyache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणें संतोषलें चित्त त्याचे ॥१॥ तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥ एका जनार्दनीं द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण तें निश्चितीं सांगा द्विजा ॥३॥