भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्रींची बाहुली वस्तुरुप झाली । पाहतां सोहं मेळीं चिदांनंद

netrinchi bahuli vasturup jhali | pahatan sohan melin chidannand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेत्रींची बाहुली वस्तुरुप झाली । पाहतां सोहं मेळीं चिदांनंद ॥१॥ अर्ध मात्रा स्थान नयनाचें निधान । मसुरेप्रमाण महावर्ण तेथें ॥२॥ सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगती । नयनींच निश्चितीं बिंदुरुप ॥३॥ सर्वगत डोळा ती जगामाझारीं । जगाचिया हारी डोळियामाजीं ॥४॥ दाखवी संपुर्ण स्वामी जनार्दन । एका एकपण नाहीं जेथें ॥५॥