भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी

nenoniyan atmahit | kariti ghat abhimani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥१॥ नसतीच वाढवूनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥२॥ नाठवूनियां विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥३॥ निळा म्हणे जन्मोनि गेला । वृथाचि पडिला निरयांत ॥४॥