भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें

nenen vedashastra puran pathan | tenen namakirtan karaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें ॥१॥ कलीमाजीं सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥ नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावें व्रत एकादशी ॥३॥ एका जनार्दनीं सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥