भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी

nene apulya hitavari | bole tyansichi virudhda kari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥ सर्व काळ अल्प बुध्दी । नेणे बोलों सभासंधी ॥३॥ निळा म्हणे तया दिसे । अवघें जगचि वेडें ऐसें ॥४॥