भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं

nenavechi bal kin he mruttika | man guntalense dekha pandurangin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥ मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥ रक्त मांस तेणें जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥ एका जनार्दनीं उदक आणुनी कांता । पाहे तंव तत्वतां बाळ न दिसे ॥४॥