भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला

nenatiyasi nenata to san | janatiya janapan dharuni thela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥ योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहतां जाय ॥२॥ जाणते नेणते येती बरवे परी । दरुशनें उद्धरी जड जीव ॥३॥ एका जनार्दनीं सगुण निर्गुण । जाणतां नेणतां सर्व आपणाचि जाण ॥४॥