भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर

nenati te apapar | vishvin jhale vishvambhar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर ॥१॥ नाहीं देहाची भावना । करितां नामसंकीर्तना ॥२॥ हरीच्या नामामृतें धाले । गिळुनी ब्रम्हांडा राहिले ॥३॥ निळा म्हणे अवघ्याचि परी । झाले व्यापक चराचरीं ॥४॥