भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेमिला काळ लागला पाठीं । हे तों दिठी पाहती

nemila kal lagala pathin | he ton dithi pahati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेमिला काळ लागला पाठीं । हे तों दिठी पाहती ॥१॥ एकापाठीं दुसरें जाय । वायां हाय हाय उरते ॥२॥ न सोडी तो लागला मागें । शिणते वाउगे मूर्ख ते ॥३॥ शरण एका जनार्दनीं । पडती वदनीं काळाचे ॥४॥