भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत

nayechi sacha ha pratiti | asoniyan bhutin bhagavant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत ॥१॥ कर्माकर्में लागलीं पाठीं । बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥ सत्यचि परि तें असत्य वाटे । भोगिती उदृष्टें आपुलालीं ॥३॥ निळा म्हणे कर्मतंत्रीं । गुंतलीं यंत्रीं मायेच्या ॥४॥