भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों

navalachi ek vate maj | kaisen guj anuvadon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥१॥ आपुली आपण बाईल जाला । आपणाचि व्याला आपणाशीं ॥२॥ मागें पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥ निळा म्हणे हा चराचरा । वसउ आंतरा बाहेरी ॥४॥