भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे

naval ha prakashavegala | jhankiliyahi dola pudhen dise

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥१॥ नव्हे हा उजळिला सवेंचि मावळला । आत्मतेजें केला उदो नित्य ॥२॥ ढवळा ना काळा पिंवळा ना जांभळा । जीवींच्या जीवनकळा प्रकाशितु ॥३॥ निळा म्हणे आजि आरतीचेनि व्याजें । कृपें पंढरीराजें कळलें मज ॥४॥