भजनी मालिका
← भजनांकडे परत

नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा

nataloniyan namarupa | yevadhaya vadhavilen sankalpa

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा ॥१॥ न कळे याची माव कोण । देवां दैव्यां विचक्षणा ॥२॥ वेदश्रुति धांडोळितां । कार्यकारणही हा परता ॥३॥ निळा हा अनुमाना । न ये योगिया मुनिजनां ॥४॥