भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें । वृत्रासुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली

narakasura vadhilen jenen | murusi marduni ghetalen thanen | vrutrasurachen harilen jinen | tarakasura pranahani keli

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें । वृत्रासुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥ मधु दैत्याचें सूदन । हिरण्याक्षाचे घेतले प्राण । हिरण्यकश्यपा विदारुन । काळयवन दग्ध केला ॥२॥ रिठासुर दाढें चाचिला । अघा बगासुर तो चीरिला । तृणासुर सहजेंचि मर्दिला । शकट मोडिला पादघातें ॥३॥ उपटिलीं धेनकासुराचीं शिंगें । कंस चाणून ते वधिले रागें । केशियाचीं मोडिली टांगे । गोंकुळीं श्रीरंगें बाळपणीं ॥४॥ परशुरामें वधिला सहस्त्रार्जुन । एकवीस वेळां क्षत्रियांचें कंदन । रामें ताटिका खरदूषण । नासिकछेदन शूर्पनखे ॥५॥ रावण कुंभकर्ण रामें मर्दिले । कित्येक निशाचरातें आटिलें । ऐसे पवाडे संपादिले । बहु वेळां उतरिले धराभार ॥६॥ निळा म्हणे जे ते अवतारीं । भक्त रक्षूनी दैत्यां मारी । ऐसिया चरित्राची हारी माळा लाविल्य कल्पादी ॥७॥