भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ

naradehin yeunin kari svartha | mukhya sadhi paramartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ॥१॥ न होतां ब्रह्माज्ञान । श्वान सूकरां समान ॥२॥ पशुवत जिणें । वायां जेवीं लाजिरवाणें ॥३॥ सायं प्रातर्चिता । नाहीं पशुंसी सर्वथा ॥४॥ मरणा टेकलें कलीवर । परी न सांडी व्यापार ॥५॥ एका जनार्दनीं पामर । भोगिती अघोर यातना ॥६॥