भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगें

naradehin sukh sohala sanskar | paritethen vikar daivayogen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगें ॥१॥ बालत्वाचें सुख अज्ञान दशेंत । रामनाम मुखांत न ये कधीं ॥२॥ तरुण अवस्था विषयांचे ध्यान । न ये तें भजन मुखीं कदा ॥३॥ जरेनें वेष्टिलें जालें वृद्धपण । एका जनार्दन भजन नेणें ॥४॥