भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें

naradehin ayushya shat ten praman | ardha ratra jan jay madhyen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें ॥१॥ बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥ एका जनार्दनीं राहिलें भजन । सवेंचि मरण पावला वेगीं ॥३॥